कोरोनात नोकरी गेली पण शेतकरी पुत्रानं कमालच केली

कोरोनात नोकरी गेली पण शेतकरी पुत्रानं कमालच केली

जालना जिल्ह्यातील मानेगावचा शेतकरी पुत्र विनोद ढेंगळे यानं मोठं यश मिळवलंय. 

आयबीपीएस परीक्षेत यश मिळवत विनोद महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा मॅनेजर झाला आहे. 

विनोदने अनेक संघर्षातून हे यश मिळवल्याने त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. 

इंजीनियरिंगचा अभ्यास कठीण वाटत असल्याने विनोदने तब्बल तीन वेळा इंजीनियरिंग सोडली. 

जालन्यातील एका कंपनीत कॉन्ट्रॅक्टवर मिळवलेली नोकरी कोरोनात गेली.

तरीही हार न मानता त्याने मित्रांच्या सल्लामसलतीने बँकिंग परीक्षांची तयारी सुरू केली. 

सुरुवातीला क्लर्क पदासाठी तयारी करणाऱ्या विनोदचा हळूहळू आत्मविश्वास वाढत गेला.

नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात त्याची विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या मॅनेजर पदी नियुक्ती झालीय

मुंबईकर तरुणानं दुचाकीवरून गाठलं लंडन