गरज ही शोधाची जननी असते असं म्हटलं जातं.
अनेक शोध हे गरजेतूनच लागल्याचं आपण इतिहासात डोकावून पाहिल्यास लक्षात येतं.
जालना जिल्ह्यातील श्रीपत धामणगावचे रहिवासी असलेल्या सुनील शिंदे यांनी गरजेतून असाच एक देशी जुगाड तयार केला आहे.
गावात असलेल्या विजेच्या समस्येला त्रासून त्यांनी सायकलच्या पेडलच्या साह्याने चालणारी पिठाची गिरणी तयार केलीये.
विशेष म्हणजे या गिरणीतून तयार होणार पीठ हे नैसर्गिक पद्धतीने जात्यावर तयार होणाऱ्या पिठाप्रमाणेच आहे.
यामुळे धान्यातील जीवनसत्वे नष्ट होत नाहीत.