तरुणांची सेंद्रिय गूळ निर्मितीमधून महिन्याकाठी लाखोंची कमाई

तरुणांची सेंद्रिय गूळ निर्मितीमधून महिन्याकाठी लाखोंची कमाई

बेरोजगारी हा देशातील अनेक महत्त्वाच्या समस्यांपैकी एक मुद्दा आहे. 

अनेक तरुण उच्चशिक्षित असून देखील त्यांच्या हाताला काम मिळत नाही म्हणून निराशेचे जीवन जगत असतात.

 मात्र, जालन्यातील सहा उच्चशिक्षित तरुणांनी एकत्र येत शेतीपूरक व्यवसाय उभारून कोटींची उलाढाल केलीय. 

महिन्याकाठी साडेचार लाखांचं उत्पन्न तरुणांना या व्यवसायातून होत आहे.

जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील सोमठाणा हे छोटसं खेडेगाव.

या गावातील विशाल नागवे सचिन धायवर, योगेश नागवे, नारायण मुटकुळे, भूषण कोल्हे, गजेंद्र गायके हे तरुण उच्चशिक्षित आहेत.

परंतु नोकरी नसल्याने बेरोजगार होते. त्यामुळे त्यांनी हा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला.

सध्या या युनिटमधून दिवसाला तब्बल सहा क्विंटल गूळ निर्मिती होती. या गुळाची 70 रुपये प्रति किलो या दराने रस्त्यावरच स्टॉल लावून विक्री केली जाते.

दिवसाला 15 ते 16 हजारांचा निव्वळ नफा हे तरुण या उद्योगातून कमावत आहेत.

रेशीम शेतीतून महिन्याकाठी 4 लाखांचे उत्पन्न