हात नसले तरी हार मानली नाही
हात नसले तरी हार मानली नाही
जालन्यातील दोन्ही हातांनी अपंग असणाऱ्या तरुणाचा संघर्ष पाहिला तर आपणही सलाम कराल.
भोकरदन तालुक्यात करजगाव येथे चौरंगीनाथ प्रभाकर लोखंडे हा 28 वर्षीय तरुण राहतो.
जन्मत: दोन्ही हात नसल्याने दैनंदिन कामे तो पायानेच करतो.
अंघोळ करणे, कपडे घालणे, मोबाइल हाताळणे यासाठीही तो इतरांची मदत घेत नाही.
विशेष म्हणजे चौरंगीनाथनं पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं असून पायानंच पेपर सोडवलेत.
शिक्षणानंतर नोकरीचा शोध घेतला पण हात नसल्यानं नोकरी मिळणं शक्य नव्हतं.
चौरंगीनाथनं हार न मानता पर्याय शोधला आणि वडिलार्जित शेती करू लागला.
बैलगाडी जुंपणे ते कोळपणी, वखारणी आदी शेतीची विविध कामेही चौरंगीनाथ पायाने करतो.
अडचणींवर जिद्द, चिकाटी आणि मेहनतीने मात करता येते याचा वस्तूपाठच चौरंगीनाथने घालून दिलाय.
न्यायाधीशांनी थेट पार्किंगमध्येच घेतली सुनावणी