एका शिक्षिकेनं बदलली परिस्थिती
एका शिक्षिकेनं बदलली परिस्थिती
जागतिक तापमान वाढ झाल्याने याचे दुष्परिणाम अनेक क्षेत्रावर झाल्याचे पाहायला मिळत आहेत.
तापमान वाढीला कारणीभूत असलेल्या अनेक घटकांपैकी एक म्हणजे प्लास्टिक होय.
प्लास्टिक बंदी करूनदेखील त्याचा वापर बंद झाला नसल्याने आता पुनर्वापर गरजेचा बनलाय.
जालना शहरातील एका शिक्षिकेनं प्लास्टिचा पुनर्वापर करण्याचा विडा उचलला आहे.
प्रतिभा श्रीपत या प्लास्टिक पुनर्वापर आणि पर्यावरण संवर्धनासाठी काम करत आहेत.
श्रीपत यांना एकेदिवशी रवंथ करण्यास त्रास होत असलेल्या स्थितीत एक गाय दिसली.
गायीची शस्त्रक्रिया केली असता पोटात प्लास्टिक असल्याने हा प्रकार झाल्याचे निदर्शनास आले.
श्रीपत यांनी घरोघरी जाऊन प्लास्टिक संकलन आणि जनजागृतीही सुरू केली.
प्लासस्टिकचे वर्गीरकरण करून त्यापासून प्लास्टिक ब्रिक्स बनवल्या जातात.
ब्रिक्सपासून वेगवेगळ्या प्रतिकृती आणि शोभेच्या वस्तू तयार केल्या जातात.
ZP च्या विद्यार्थ्यांना नव्या जगाचं ज्ञान !
Learn more