शिक्षकांचा प्लास्टिक बंदीसाठी अनोखा फंडा

शिक्षकांचा प्लास्टिक बंदीसाठी अनोखा फंडा

कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमात प्लास्टिक ताट आणि ग्लासांचा वापर हल्ली सर्रास होऊ लागला आहे. 

प्लास्टिक मुळे होणाऱ्या दुष्परिणाम माहीत असून देखील आपण याकडे दुर्लक्ष करतो. 

या समस्येवर जालना जिल्ह्यातील दोन शिक्षकांनी स्वयंप्रेरणेतून तोडगा काढण्याचा निर्णय घेतला आहे. 

राजूर येथील विष्णू गवळी आणि विनोद पांडे हे दोघे जिल्हा परिषद शिक्षक आहेत. 

कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमात जाताना जेवणासाठी ते स्टीलचे ताट आणि ग्लास घेऊन जातात. 

जेवण आणि चहा नाश्त्यासाठी हे शिक्षक प्लास्टिकचे ताट किंवा ग्लास वापरत नाहीत. 

एका कार्यक्रमात विद्यार्थ्यांनाही घरून ताट आणि ग्लास आणायला सांगून एक नवा पायंडा पाडला. 

पृथ्वीच्या आरोग्यासाठी प्लास्टिक घातक असून आमच्या परीने जनजागृती केल्याचे शिक्षक सांगतात.