तितर पालनातून शेतकऱ्याची महिन्याकाठी 50 हजार रुपयांची कमाई

तितर पालनातून शेतकऱ्याची महिन्याकाठी 50 हजार रुपयांची कमाई

शेती हा व्यवसाय दिवसेंदिवस आव्हानात्मक बनत चालला आहे. आसमानी आणि सुलतानी संकटे याबरोबरच बाजारभावाचे गणित आणि सरकारी धोरणे इत्यादींचा फटका शेतीला नेहमीच बसत असतो.

याच गोष्टींतून धडा घेत अनेक शेतकरी शेतीबरोबरच शेतीपूरक जोड व्यवसायाकडे वळलेले आहेत.

जालना जिल्ह्यातील लहानगोला गावाचे शेतकरी झहीर खान यांनी आपल्या शेतात तितर पालन व्यवसाय सुरू केला आहे.

200 पक्ष्यांपासून सुरू करण्यात आलेल्या या व्यवसायाने आता मोठ स्वरूप धारण केलं असून दर महिन्याला झहीर खान दीड हजार पक्षांची 70 रुपये नग याप्रमाणे विक्री करतात.

 यातून त्यांना महिन्याकाठी 50 हजाराचे निव्वळ उत्पन्न मिळत आहे.

झहीर खान हे मोबाईल वरती यूट्यूब पाहत असताना त्यांनी शेलगाव येथील एका शेतकऱ्याच्या तितर पालन व्यवसायाचा व्हिडिओ पाहिला. यानंतर त्यांनी त्या शेतकऱ्याशी संपर्क साधला.

प्रत्यक्ष ठिकाणावर जाऊन व्यवसायाची पाहणी केली आणि 200 तीतर पिल्लांची नोंदणी केली.

व्यवसायाच्या सुरुवातीला अनेक अडचणी आल्यात मात्र त्यांनी हार न मानता व्यवसायात तग धरून ठेवला कोरोना काळात तर प्रचंड अडचणी आल्या, असं झहीर खान सांगतात.

मात्र व्यवसाय टिकून ठेवल्याचे गोड फळे आता मिळत आहेत. तब्बल दीड ते दोन हजार पक्ष्यांची विक्री दर महिन्याला ते या व्यवसायातून करतात.

70 रुपये नगाने या पक्षांची विक्री केली जाते. महिन्याकाठी 1 ते सव्वा लाख रुपयांच्या पक्षांची विक्री होते.

यातून महिन्यासाठी 50 ते 60 हजारांचा निव्वळ नफा राहतो, असे झहीर खान यांनी सांगितलं.

हमाल कसा झाला उद्योगपती?