Vastu: जास्वंदीच्या फुलाचे खास आहेत वास्तू उपाय

Vastu: जास्वंदीच्या फुलाचे खास आहेत वास्तू उपाय

घरात नेहमी अशांतता असते, पैसा टिकत नाही, नकारात्मक वातावरण असतं, अशी तक्रार अनेक जण नेहमी करताना दिसतात.

वास्तुशास्त्रात यावर अनेक उपाय सांगितले गेले आहेत. योग्य दिशेला फूलझाडं किंवा वनस्पतीची लागवड केल्यास या समस्या दूर होऊ शकतात.

जास्वंदीचं लाल फूल म्हटलं, की आपल्या डोळ्यासमोर सर्वप्रथम येते ती श्री गणेशाची मूर्ती. कारण गणपतीला हे फूल विशेष प्रिय आहे.

वास्तुशास्त्रानुसार, घराच्या उत्तर (North) किंवा पूर्व दिशेला (East) जास्वंदीचं झाड लावल्याने घरातलं वातावरण चांगलं राहतं.

जास्वंदीच्या झाडामुळे घरामध्ये धनधान्याची कमतरता भासत नाही, असे मानले जाते.

सूर्यप्रकाशासाठी हे झाड तुम्ही घरातल्या खिडकीजवळही लावू शकता. घरात हे झाड लावण्याचे अनेक फायदे आहेत

धर्मशास्त्रातही जास्वंदीचं फूल शुभ मानलं गेलं आहे. जास्वंदीचं फूल सौभाग्याचं प्रतीक मानलं गेलं आहे.

रोजच्या पूजेसाठीदेखील या फुलाचा वापर होतो. शनिवारी श्री हनुमानाला जास्वंदीचं फूल अर्पण करणं चांगलं मानलं जातं.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.) –