फक्त एकाच वडापावमध्ये ‘इथं’ होईल पोट फूल्ल

राज्यातल्या कोणत्याही भागात हमखास आढळणारे फास्ट फुड म्हणजे वडापाव.

प्रत्येक भागात वडापाव बनवण्याची पद्धत आणि त्याचं वैशिष्ट्य वेगळे आहे.

बीड शहरातल्या नगर रोड भागात सध्या जम्बो वडापाव मिळतोय.

बीड शहरातील नगर रोड परिसरमध्ये 2003 मध्ये शशिकांत रसाळ एका स्टॉलवर वडापावच्या विक्रीला सुरुवात केली.

या भागात अनेक सरकारी कार्यालय आहेत.

त्या कार्यालयात वेगवेगळ्या कामांसाठी ग्रामीण भागातले नागरिक येतात.

त्यांची गैरसोय होऊ नये तसंच एका वडापावमध्ये त्यांचं पोट भरावं या उद्देशानं त्यांनी जम्बो वडापावच्या विक्रीला सुरूवात केली.

रसाळ यांनी वडापाव विक्रीला सुरूवात केली त्यावेळी तीन ते चार किलो बटाट्याचे मिश्रण लागत असे.

तसंच दिवसाला 50 ते 60 प्लेटची विक्री होत होती. त्यावेळी एका वडापावची किंमत 5 रुपये होती.

या वडापावची साईज मोठी होती. त्यामुळे तो ग्राहकांमध्ये चांगलाच लोकप्रिय झाला.

MBA चहानंतर आता घ्या MBBS डोसाची चव