महाराष्ट्रात पिकतेय टरबुजा एवढी संत्री

महाराष्ट्रात पिकतेय टरबुजा एवढी संत्री

नागपूरची संत्री सर्वांना माहिती आहेत. पण काश्मिरी संत्री कधी पाहिलीत का?

वर्धा येथील रोहिणी विजय बाबर यांच्या घरी काश्मिरी संत्र्याचे झाड आहे. 

गेल्या तेरा वर्षांपासून बाबर यांच्या परसबागेत काश्मिरी संत्री बहरली आहे. 

महाराष्ट्रातील संत्र्यांपेक्षा ही संत्री वेगळी असून आतून लाल तर चवीला तुरट आहेत.

काश्मिरी संत्री आकाराने मोठी असून एकाचं वजन 3 किलोपर्यंत आहे. 

या संत्रीमध्ये विटामिन सी भरपूर प्रमाणात असून आरोग्यासाठी फार हितकारक आहे.

शुगरच्या रुग्णांसाठी आणि पोटाचे आजार असलेल्या रुग्णांसाठी  हे फायदेशीर आहे. 

साल कडक असलेल्या या संत्रीला कोकणात पपनस असं म्हणतात. 

पुण्यात 10 रुपयांत मिळतात मातीची भांडी