पुण्यातील ‘हे’ पथक करणार अयोध्येत शंखनाद 

राम जन्म भूमी असलेल्या अयोध्येत श्रीरामाच मंदिर होत आहे.

22 जानेवारी रोजी अयोध्या येथे राम मंदिराची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे.

उदघाट्नाची उत्सुकता सगळ्यांनाच लागून राहिली आहे. यासाठी विविध उपक्रम देखील राबवले जात आहे.

पुण्यातील केशव शंखनाद पथकाला राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनाच्या कार्यक्रमासाठी शंखनाद करण्यासाठी खास निमंत्रित करण्यात आलं आहे.

याबाबतचा पत्र श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे महामंत्री चम्पत राय यांनी पथकाचे अध्यक्ष नितीन महाजन यांना दिलं आहे.

केशव शंखनाद पथकाचे 111 वादक हे येथे जाऊन शंखनाद करणार आहेत.

ही गोष्ट नक्कीच पुणेकरांसाठी अभिमानाची आहे.

हनुमानावरून बाळाचं नाव ठेवायचं आहे? ही 10 नावे पहा