'या' 11 गणपतींचं एकदा तरी घ्या दर्शन
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आल्यामुळे लाडक्या बाप्पाच्या आगमनाची तयारी आहे.
महाराष्ट्रात अष्टविनायकांबरोबरच प्रत्येक गावाची आणि शहराची खास अशी गणेश श्रद्धास्थाने आहेत.
अशा गणेश स्थानांविषयीची माहिती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
मानाचा पहिला गणपती – कसबा गणपती हे पुण्याचं ग्रामदैवत. या गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे.
मानाचा दुसरा गणपती - श्री तांबडी जागेश्वरी ही पुण्याची ग्रामदेवता. म्हणूनच तांबडी जोगेश्वरी गणपतीला मानाचं दुसरं स्थान प्राप्त झाल आहे.
मानाचा तिसरा गणपती - गुरुजी तालीम मंडळाचा गणपती हा पुण्याचा मानाचा तिसरा गणपती.
मानाचा चौथा गणपती - पुण्यातला मानाचा चौथा गणपती आहे तुळशीबागेतला गणपती.
मानाचा पाचवा गणपती - पुण्यातला पाचवा मानाचा गणपती आहे केसरी गणपती.
मुंबई परिसरातील गणपती - मुंबईमधील अनेक गणपतींपैकी एक म्हणजे सध्या प्रख्यात असलेला प्रभादेवीजवळचा सिद्धिविनायक.
मोरया गोसावी मंदिर - चिंचवड स्टेशनपासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर मोरया गोसावी मंदिर आहे.
कोल्हापूर गणेशवाडीचा गणपती - शिरोळ तालुक्यातील हे गणेशस्थान 56 विनायकांपैकी आहे असे म्हणतात.
साताऱ्याचा ढोल्या गणपती - या गणेशाची मूर्ती आकाराने 10 ते 12 फूट उंच असल्याकारणाने त्याला ढोल्या गणपती म्हणतात.
विदर्भातील गणपती - यवतमाळहून वर्धा - नागपूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर कळंबचा चिंतामणी आहे.
विशाल माळीवाडा गणपती - नगर शहराच्या दक्षिणेकडे माळीवाडा वेशीने आत जात असताना हे पुरातन गणेश मंदिर लागते.
महाराष्ट्रातील अष्टविनायक दर्शन
Learn more