झोपण्याची योग्य पद्धत आणि फायदे वाचा...

झोप चांगली झाली तर तुमचा दिवस आणि शरीर दोन्ही चांगले राहते. 

शरीराला आरोग्यदायी आणि उत्साही बनवण्यासाठी 6 ते 8 तासांची झोप महत्त्वाची आहे. 

चांगल्या झोपेसाठी वेगवेगळ्या स्लिपिंग पोजिशन ट्राय करता येऊ शकतात.

प्रत्येक स्लिपिंग पोजिशनचे वेगवेगळे फायदे आहेत.

फेटल पोजिशन - या स्थितीमध्ये शरीर आणि पाय एकीकडे वाकलेले असतात. यामुळे पाय आणि कमरेला आराम मिळतो.

एका बाजूला वळून झोपणे - यामध्ये पाय न वाकता सरळ ठेवले जातात. 

ही स्थिती झोपण्यासाठी बेस्ट मानली जाते.

पाठीवर झोपणे - पाठीवर झोपल्याने पाठीचा कणा मजबूत होतो.

ही पोजिशन हिप्स आणि गुडघ्यांचा आजार दूर करण्यासाठीही मदत करू शकते.