कोजागिरीला चंद्रप्रकाशात बनवलेली खीर, मसाले दूध अमृतासमान?

शरद पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा असेही म्हणतात.

यंदा कोजागिरी म्हणजेच शरद पौर्णिमा 28 ऑक्टोबरला आहे.

या दिवशी चंद्रातून निघणारी किरणे अमृतसमान मानली जातात.

यामुळेच या दिवशी मसाले दूध किंवा खीर चांदण्यात बनवली जाते.

असं केल्यानं त्यात चंद्राची किरणे पडतात आणि अमृताचा प्रभाव मिळू शकतो.

अशा प्रकारे केलेली खीर, मसाले दूध खाल्ल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते.

पौर्णिमा तिथी 28 ऑक्टोबर रोजी सकाळी 04:17 ते रात्री 01:53 पर्यंत आहे.

उदय तिथीच्या आधारे शरद पौर्णिमा 28 ऑक्टोबर रोजी साजरी होणार आहे.

शरद पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे.

येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही