वाघ नव्हे ही तर वाघाची मावशी!

वाघ नव्हे ही तर वाघाची मावशी!

कोल्हापुरातील महेश सुतार हे मांजरप्रेमी असून त्यांच्याकडे विविध जातीच्या 11 मांजर आहेत.

महेश यांच्याकडे 3 पर्शियन आणि 8 बेंगाल कॅट जातीच्या मांजर आहेत. 

बेंगाल कॅट पाहिली तर वाघ नव्हे ही वाघाची मावशी असल्याचं कळणारही नाही.

खरंतर ही एक संकरीत मांजर असून दोन वेगवेगळ्या जातीच्या मांजरांपासून विकसित झालीय. 

महेश यांनी रशियातून एक बेंगॉल कॅट आयात केली असून तिची किंमत 3 ते 4 लाख रुपये आहे.

भारतात संकरीत केलेली मांजर घेण्यासाठी 1.5 ते 3 लाख रुपयांपर्यंत खर्च येतो.  

महिन्याला साधरण 10 ते 15 हजार रुपयांपर्यंतचा 2 बेंगॉल कॅट सांभाळण्याचा खर्च येतो. 

कच्च्या भाज्या, फळे यासोबतच विविध कंपन्यांचे मांजराचे खाद्य त्यांना दिले जाते.

एखाद्या बिबट्यासारखी दिसणारी ही मांजर अनेक कॅट शोमध्ये विजेतेपद पटकावतेय. 

बॉडी बिल्डर होण्याची त्रिसूत्री