एका गुंठ्यात उसाचं विक्रमी 3 टन उत्पन्न

पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर हा एक सधन ऊस उत्पादक जिल्हा आहे. 

कोल्हापुरातील पन्हाळा तालुक्यात एका प्रयोगशील शेतकऱ्याने उसाचं विक्रमी उत्पन्न घेतलंय. 

वाघवे येथील शेतकरी उदय पाटील यांनी 18 गुंठे शेतीत तब्बल 57 टन उसाचं उत्पादन काढलंय. 

गेली 15 ते 20 वर्षे शेती व्यवसायात प्रयोग करत त्यांनी तरुण शेतकऱ्यांपुढे एक नवा आदर्श ठेवलाय.

उदय यांनी 86032 या उसाचे एका गुंठ्याला तब्बल 3 टनाहून अधिक उत्पादन घेत चांगला नफा मिळवलाय.  

भुईमूग, मिरची, मेथी अशी आंतरपिके घेऊन त्यांनी त्यातूनही सव्वा लाख रुपये मिळवले आहेत.

50 हजार रुपये खर्च वगळला तर 18 गुंठ्यात अडीच लाख रुपये निव्वळ नफा मिळाला आहे. 

याआधी भातपीक स्पर्धेमध्ये सहभाग आणि पॉलिहाऊस शेतीमध्ये त्यांनी जरबेरा फुलांची शेती केली होती.