वडाचं झाड आणि वडापाव कनेक्शन

वडाचं झाड आणि वडापाव कनेक्शन

एखादं झाड इतरांना फळं, फुलं, सावली देतं. फार फार तर एखाद्याला आधार देऊ शकतं. 

कोल्हापुरात एका झाडाने चक्क एका खाद्यपदार्थाला प्रसिद्धी मिळवून दिलीय. 

कोल्हापुरातल्या एका भल्या मोठ्या वटवृक्षामुळेच 'झाडाखालचा वडापाव' प्रसिद्ध झालाय.

कोल्हापुरात रुईकर कॉलनी नजीक सध्या झाडाखालचा वडापाव हे एक मोठं हॉटेल झालंय. 

पूर्वी या ठिकाणी फक्त मुजावर बंधूंची एक वडापावची छोटी गाडी होती. 

इम्रान यांचे वडील उदरनिर्वाहासाठी जवळपास 40 वर्षांपूर्वी विशाळगडहून कोल्हापुरात आले होते. 

1969 साली या वडाच्या झाडाखाली चहा विक्रीचा आणि पुढे वडापाव विक्रीचा व्यवसाय सुरू केला. 

ग्राहकांना पत्ता सांगताना 'झाडाखालचा वडापाव' सांगितल्याने हेच नाव प्रचलित झाले. 

अतिक्रमणामुळे गाडा हलवावा लागल्यानंतर मुजावर बंधूंनी झाडाचेही पुनर्रोपन केलेय.