सध्या लग्नसराई धुमधडाक्यात सुरू असून प्रत्येकजण त्यासाठी तयारी करताना दिसत आहे.
अशातच ट्रॅडिशनल लूकसाठी फक्त मुलीच नाही तर मुलंही क्रेझी असतात.
मुलींसाठी ट्रॅडिशनल कपड्यांमध्ये अनेक व्हरायटी मिळतात. तेच मुलांसाठी यामध्ये लिमिटेड ऑप्शन असतात.
आज आम्ही तुम्हाला पुण्यातील प्रसिद्ध दुकानात असणाऱ्या कुर्त्याच्या काही व्हरायटी दाखवणार आहोत.
पिंपरी चिंचवडमधील लक्ष्मी या दुकानात तुम्हाला 400 ते 25000 किमतीत हव्या त्या डिजाईनमध्ये कुर्ते शिवून मिळतील.
ट्रॅडिशनल कुर्ता सिंम्पल कटमध्ये असतो. वेडिंगसाठी डिझायनर कुर्त्यांमध्ये जास्त वर्क असतं.
जास्त बारिक असणाऱ्या किंवा जास्त वजन असणाऱ्या सगळ्या लोकांसाठी हा कुर्ता बेस्ट ऑप्शन ठरतो, असं दुकानदार सांगतात.