कुशल बद्रिकेची बायकोसोबत धम्माल!

अभिनेता कुशल बद्रिके सध्या मॅडनेस मचायेंगे या हिंदी कॉमेडी शोमध्ये काम करतोय.

शुटींगमधून वेळ काढून कुशल सध्या सुट्ट्यांचा आनंद घेतोय.

कुशल फॅमिलीबरोबर कोकणात गेला आहे. निसर्गरम्य कोकणातील फोटो कुशलनं शेअर केलेत.

कुशलनं शेअर केलेल्या फोटोंमध्ये तो बायकोबरोबर धम्माल करताना दिसतोय.

येवा कोंकण आपलोच आसा ! असं म्हणत कुशलनं फोटो शेअर केलेत.

दोघांचे फोटो पाहून "असेच हसत रहा… Perfect pic दादा", अशा कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत.

कुशल नेहमीच बायकोवरचं प्रेम व्यक्त करत असतो. दोघांचे फोटो देखील सोशल मीडियावर पाहायला मिळत असतात.

कुशलच्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळाली आहे.