महिलांनो! ब्रा विकत घेताना 'या' चुका टाळा

ब्रा ही महिलांसाठी एक अत्यंत महत्वाची वस्तू आहे.

जर योग्य ब्रा खरेदी केली नाही तर लूक बिघडतोच पण आरोग्याच्या अनेक समस्या देखील जाणवतात.

तेव्हा ब्रा विकत घेत असताना कोणत्या चुका टाळाव्यात हे जाणून घ्या.

ब्रा खरेदी करताना फिटिंग, स्ट्रेप्स, कप्स आणि बँड या तीन महत्वाच्या गोष्टींची खास काळजी घ्यायला हवी

चांगल्या ब्रॅंड्सचे ब्रा खरेदी करायला हवेत ज्यामुळे ते जास्तीत जास्त काळ टिकतील.

ब्रा तुमच्या स्तनांच्या आकाराप्रमाणे निवडावी. ती जास्त घट्ट किंवा सैल नसावी.

स्वत:साठी नवीन ब्रा खरेदी करण्यापूर्वी तुम्ही नेहमी साईझ तपासा. कारण शरीरात विविध कारणांमुळे दरवर्षी बदल होत असतात.

लूज फिटिंगची ब्रा विकत घेणे टाळा. लूज फिटिंगमुळे तिथली स्किन सैल पढून भविष्यात स्तन ओघळल्यासारखे दिसू शकतात.

स्टायलिश ब्रा खरेदी करणे टाळा. कारण त्या स्तनाला योग्य कव्हरेज देत नाहीत.

ब्रेसीयर खरेदी केल्यानंतर ती पुढील सहा महिन्यांसाठी वापरणे योग्य ठरते. तेव्हा एकच ब्रा वर्षानुवर्षे घालणे टाळा.

ब्रेसीयर वापरल्यानंतर ठराविक कालांतराने त्याचे कप्स, बँड, स्ट्रिप्स यांच्यात सततच्या वापराने फरक पडतो त्यामुळे दर सहा महिन्यांनी ब्रेसीयर बदलणे अतिशय महत्वाचे असते.

नवीन ब्रँडच्या ब्रेसियरची खरेदी करण्यापूर्वी नेहमी साइज चार्ट तपासा.

तुम्हाला योग्य ब्रा साईज किंवा कप साईज माहित नसेल तर एक्स्पर्टचा सल्ला घ्या.