भारतामध्ये क्रिकेट वर्ल्ड कपला सुरूवात झाली आहे, त्यामुळे क्रिकेटवर बेतलेल्या 5 चित्रपटांवर नजर टाकूया.

लगान चित्रपटाची स्टोरी एका शेतकऱ्याची आहे, जो ब्रिटिशांनी क्रिकेटच्या मैदानावर त्यांना हरवण्याचं आव्हान स्वीकारतो, यामुळे गावकऱ्यांचा 3 वर्षांचा कर माफ होतो.

भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अजहरुद्दीनच्या आयुष्यावर बेतलेला अझर हा चित्रपटही काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. 

इक्बाल ही मुकबधिर मुलाची कथा आहे, ज्यात त्याने क्रिकेटर बनण्याचं ध्येय पूर्ण करण्यासाठी अडचणींवर मात केली. 

एमएस धोनी हा चित्रपट भारतीय क्रिकेटपटू एमएस धोनीच्या जीवन प्रवासावर बेतला आहे. धोनी हा भारताचा सगळ्यात यशस्वी कर्णधार आहे. 

83 हा चित्रपट कपिल देव यांच्या प्रवासावर आहे. भारताने 1983 सालचा वर्ल्ड कप जिंकला त्या टीमचं नेतृत्व कपिल देव यांनी केलं होतं.