सध्या काळात दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील शेतकरी आपल्या शेतात नवनवे प्रयोग करत आहेत.
कमी पाण्यात येणाऱ्या फळबागांकडे शेतकऱ्यांचा कल वाढतोय.
लातूर जिल्ह्यातील गुंफावाडी भागात पाण्याचा तुटवडा आहे.
तरीही येथील शेतकरी महेश लांडगे यांनी आपल्या शेतात विविध प्रयोग केले.
ड्रॅगन फ्रुटच्या शेतीत स्ट्रॉबेरीचं आंतरपीक घेतलं आणि त्यांना यातून दुहेरी नफा मिळतोय.
शेतकरी महेश लांडगे यांना गुंफावाडी या त्यांच्या गावात वडिलोपार्जित 10 एकर जमीन आहे.
यामध्ये ड्रॅगन फ्रुट, स्ट्रॉबेरी, सफरचंद, सीताफळ अशी पिके ते सातत्याने घेत असतात.
यंदा सप्टेंबर महिन्यात ड्रॅगन फ्रुटच्या शेतीतच आंतरपीक म्हणून स्ट्रॉबेरीची लागवड केली.
त्यांचा हा प्रयोग देखील यशस्वी झाला. दीड महिन्यात स्ट्राबेरीचे पिक तोडणीस येते.
आतापर्यंत तोडणी करून एक लाखाचे उत्पन्न मिळाले आहे, अशी माहिती महेश यांनी दिली.