विशेष मुलांसाठी खास खेळणी 

खेळणी हा लहान मुलांचा आवडता विषय. ती खेळणी आई , बाबा आजी आजोबा यांच्याकडून हट्टाने विकत घ्यायची.

सर्व भान हरपून त्या खेळण्याच्या विश्वात दंग व्हायचं हे मुलांचं आवडतं काम.

या खेळण्यांमुळे मुलांच्या बौद्धिक विकासाला चालना मिळाली तर? विशेषत: विशेष मुलांसाठी या प्रकाराची खेळणी अत्यंत उपयोगाची ठरु शकतात.

डोंबिवलीच्या लेखा नवरे-देशपांडे यांनी हाच विचार करुन या मुलांसाठी खास प्रकारची खेळणी तयार केली आहेत.

लेखा यांनी विशेष मुलांच्या शाळेत शिक्षक म्हणून काही दिवस काम केलं आहे.

हे काम करत असतानाच मुलांना वेगळ्या पद्धतीनं हा विषय शिकवावा असा विचार त्यांच्या मनात येऊ लागला.

त्यांनी सुरूवातीला कागद आणि पुठ्ठ्यापासून खेळणी बनवली. ही खेळणी टिकाऊ नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं.

त्यानंतर त्यांनी लवकर खराब होणार नाहीत अशी  कापडापासून खेळणी तयार केली.

हत्ती, टेडी, पिकाचुर असे कार्टूनचे आकार, प्राणी, पक्षी, फुल, पान, असे वेगवेगळे प्रकार खेळणी त्यांनी तयार केली आहेत.