या 5 भाज्या लिव्हर ठेवतील मजबूत-निरोगी!

लिव्हर हा आपल्या शरीराचा अविभाज्य भाग आहे. 

निरोगी शरीरासाठी लिव्हर निरोगी असणं खूप आवश्यक आहे. 

लिव्हर खराब झाल्यास ते स्वतःला पुन्हा निर्माण करू शकते, परंतु ते पूर्णपणे आहारावर अवलंबून असते. 

लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी अनेक पदार्थ आणि भाज्या फायदेशीर असतात. 

बीटरूट खाल्ल्याने लिव्हर मजबूत आणि निरोगी राहते. कारण यात अँटी-ऑक्सिडेंट, अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. 

फॅटी लिव्हर किंवा लिव्हर ट्यूमरची समस्या ब्रोकोलीने दूर ठेवली जाऊ शकते. ब्रोकोली लिव्हरच्या आरोग्यासाठी चांगली असते.

हिरव्या पालेभाज्यातील अँटी-ऑक्सिडंट्स अवयवांना मुक्त रॅडिकल्सच्या नुकसानीपासून वाचवतात.

ब्रसेल्स स्प्राउट्स पचन सुधारतात, जीवनसत्त्वे आणि खनिजे प्रदान करतात.तसेच लिव्हरला चांगले काम करण्यासही मदत करतात. 

गाजर खाल्ल्याने लिव्हर मजबूत होते. गाजर लिव्हरशी संबंधित आजारांपासून बचाव करण्यात मदत करू शकते.