22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं लाइव स्क्रीनिंग PVR वर

22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात रामललाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.

या विशेष प्रसंगी संपूर्ण देश राममय झाला आहे. देशभरात जय्यत तयारी सुरू आहे

रामानंद सागर यांची 'रामायण' ही मालिका प्राणप्रतिष्ठापनेच्या दिवशी चित्रपटगृहांमध्ये दाखवली जाणार आहे.

22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठापना सोहळा, राम मंदिराच्या उद्घाटनाचे थेट लाईव्ह स्क्रिनिंग केले जाईल.

हा महत्त्वाचा कार्यक्रम भारतातील 70+ शहरांमधील 160+ सिनेमागृहांमध्ये थेट प्रसारित केला जाईल.

सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत समारंभाचे थेट स्क्रिनिंग होईल

याचे तिकीट पीव्हीआर आयनॉक्स अॅप किंवा इतर प्लॅटफॉर्मवरून बुक केले जाऊ शकते

सिनेमागृहात या सामूहिक उत्सवाचा आनंद लोकांना अनुभवता येईल. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येतील राम मंदिरात राम लल्लाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करणार आहेत.