42 वर्षीय ब्रायन जॉन्सन 'लिव्हर किंग' म्हणून प्रसिद्ध आहे.
ब्रायन प्राण्यांचे मांस आणि त्यांच्या शरीराचे वेगवेगळे भाग कच्चे खातो.
ब्रायन त्याचा जास्त वेळ कुटुंबासोबत जंगलात आणि दऱ्याखोऱ्यांमध्ये घालवतो.
यातून तो त्याची शहरी लाइफस्टाइल बदलतोय, असा त्याचा विश्वास आहे.
ब्रायन पूर्णपणे फळे आणि कच्चे मांस यावर जगतो.
यासोबत तो खूप व्यायम करतो आणि चांगली झोपही घेतो.
आपल्या पूर्वजांप्रमाणे राहिल्यानं शरीर निरोगी राहतं असं ब्रायन सांगतो.
म्हणूनच आदि-मानव बलवान होता असं ब्रायन सांगतो.
त्याच्यासारखी लाइफस्टाइल असल्यावर कोणीही बलवान बनू शकतं.