पुणे शहराची खाद्य संस्कृती प्रसिद्ध आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ खायला मिळतात.
परंतु पुणेकर खवय्ये आणि त्यांची पसंती जपणे ही जणू तारेवरची कसरत.
मात्र प्रभा उपहारगृहाणे पुणेकरांची ही पसंद गेल्या 85 वर्षांपासून जपली आहे.
1940 मध्ये सुरु केलेला हा व्यवसाय गेल्या अनेक वर्षांपासून पुणेकरांची पसंत जपण्याचं कामं करत आहे.
त्यामुळे याठिकाणी खवय्यांची मोठी गर्दी पाहायला मिळते.
नारायण पेठेत, केसरी वाड्यासमोर असलेले ‘प्रभा विश्रांती गृह’ हे तिथल्या बटाटेवड्यासाठी प्रसिद्ध असून हे वडे ‘प्रभाचे वडे’ या नावाने ओळखले जातात.
सोबत पाव किंवा चटणी न देता पारंपारीक पद्धतीचा नुसता बटाटेवडा या ठिकाणी मिळतो.
या ठिकाणी तुम्हाला साबुदाणा वडा, मिसळ आणि साबुदाणा खिचडी हे प्रभामधले इतर लोकप्रिय पदार्थ आहेत.