कोकण म्हटलं की सगळ्यांना आठवतात ते मासे. कोकणाला समुद्र किनार पट्टी लाभल्यामुळे तिथे अनेक प्रकाचे मासे हे पाहिला मिळतात.
त्यांची मासे बनविण्याची स्वत:ची अशी विशिष्ट पद्धत आहे. केवळ मासेच नव्हेत तर कोकणातील शाकाहारी पदार्थही तितकेच लोकप्रिय आहेत.
मात्र पुणेकरांना कोकणातल्या या पदार्थांची चव चाखण्यासाठी कोकणात जायची गरज नाही.
कारण खवय्यांना आता कोकणी पद्धतीच्या खास पदार्थांची चव पुण्याच्या जवळच चाखता येणार आहे.
पुण्यातील चिंचवड येतील इंदवटी हॉटेल या ठिकाणी कोकणी प्रकारचे व्हेज आणि नॉन व्हेज पदार्थ खायला मिळतील.
कोकण किनारपट्टीवर मिळणारे पापलेट, सुरमई, कोळंबी, बोंबी, बांगडा या ठिकाणी मिळतात.
याच बरोबर व्हेजमध्ये डाळिंबी उसळ, काळ्या वाटाण्याची उसळ, वांग्याचे भरीत असे पदार्थही याठिकाणी उपलब्ध आहेत.