एका तासात 1200 चपात्या बनवणारी मशीन

आता कार्यक्रमांमध्ये चपात्या बनवण्यासाठी मशीनचा वापर केला जातो. 

पूर्वी कोणत्याही कार्यक्रमात सर्व स्वयंपाक हातानेच बनवला जायचा.

बदलत्या काळानुसार, चपात्या बनवण्यासाठी मशीनचा वापर होऊ लागला.

कणिक मळण्याची मशीन तर फार वर्षांपूर्वी आली होती.

सध्या चर्चा आहे ती चपातीच्या मशीनची.

कणिक मळल्यानंतर पिठाचे गोळे मशीनमध्ये टाकल्यास गरमा-गरम चपात्या बाहेर येतात.

या चपात्यांचा आकार हाताने लाटलेल्या चपात्यांसारखाच असतो.

मशीनमध्ये तासाभरात 1200 चपात्या बनून तयार होतात. 

मशीनमध्ये कोणताही अडथळा आल्यास ती आपोआप बंद होते.