वाह! एका हाताने साकारतो  सुरेख मूर्ती

कलाकाराची कला कधीच मरत नाही, ती कायम जिवंत राहते. तुषार विनायक सावंत यांच्याबाबतही काहीसं असंच घडलं.

गुजरातच्या वडोदरात राहणाऱ्या या पठ्ठ्याने 2012 साली अपघातात एक हात गमावला. त्याचं वय होतं अवघं 32 वर्ष.

डिप्रेशन आलं, नको नको ते वाटलं...पण आता एकच हात आहे, जगू कसा? असा विचार त्याच्या मनात कधी आला नाही.

त्याने एका हाताच्या जोरावर पूर्वीसारखं आयुष्य जगायला सुरुवात केली. शिवाय आपली कलादेखील जोपासली.

वडोदरा शहरात त्याने ख्वाहिश आर्ट स्टुडिओ उभारलं. इथेच तो मूर्ती बनवतो, चित्र काढतो.

भलेभले आश्चर्यचकीत होतात, इतक्या सुरेख आणि सुबक त्याच्या कलाकृती असतात.

तुषार म्हणतो, 'मला चित्रकलेची प्रचंड आवड आहे. मला चांगले चित्र काढता येतात. मात्र मी शिल्पकलेस सुरुवात केली, कारण माझ्यावर घरची जबाबदारी होती.'

तुषारने अलीकडेच आठ फूट उंच मूर्ती उभारली. मारुतीच्या कुशीत बाप्पा बसले आहेत, अशी ही सुंदर पर्यावरणपूरक मूर्ती आहे.

ही पूर्ण मूर्ती बनवायला केवळ तीन दिवस लागले. याच वेगाने तुषार वर्षभरात 200 ते 250 मूर्ती बनवतो.