Diabetes: 'शुगर'मुळे सगळं गोड सोडायची गरज नाहीये, पण 'हे' पदार्थ आजच सोडा!

शुगर म्हणजे फक्त गोड पदार्थ नाही, तर त्याव्यतिरिक्तही आपल्या खाण्यात असे अनेक पदार्थ येतात ज्यामुळे शरिरातली साखरेची पातळी वाढते.

साखरेची पातळी वाढली की, Diabetes म्हणजेच मधुमेहासारख्या गंभीर आजाराची सुरूवात होते.

त्यामुळे साखर वाढवणारे पदार्थ आजच आहारातून वगळा.

झारखंडची राजधानी असलेल्या रांचीचे डॉक्टर वी के पांडे यांनी याबाबत माहिती दिली आहे.

मैद्यापासून बनवलेल्या कोणत्याही पदार्थामुळे साखर प्रचंड वाढते.

खूप तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाल्ले तरी शुगरचा त्रास होऊ शकतो.

शरिरासाठी सर्वात जास्त हानीकारक असतात जिभेला, घश्याला Tasty चटका देणारे कोल्ड ड्रिंक्स.

जास्त साखरेचा चहा, कॉफी घेणंही बंद करा.

कितीही गोड आवडत असलं तरी कंट्रोल करा आणि गोडाचे पदार्थ प्रमाणात खा.