कुठेच नाही मिळणार एवढा स्वस्त शालू!
सध्या सुरू आहे लग्नसराई. त्यामुळे बाजारपेठांमध्ये दिसते खरेदीची लगबग.
तुम्हाला लग्नात शालू नेसायचाय पण तो स्वस्तही हवा आणि भारीही हवा?
मग मुंबईच्या दादरमधील हिंदमाता मार्केटमध्ये जा.
इथं तुम्हाला 5 हजारांचा शालू मिळेल 2 हजार रुपयांत.
प्राची फॅशन दुकानात महागड्या साड्या आणि शालू मिळतील होलसेल दरात.
प्राची फॅशन दुकानाची स्वतःची मॅन्युफॅक्चरर कंपनी आहे सूरतमध्ये.
त्यामुळे इथं महागातली महाग साडी मिळते स्वस्त दरात.
अर्धरेशमी, रुंद काठाचा शालू, काठा पदराचा शालू, कोयरीकाठी शालू, खडीकामाचा शालू, गर्भरेशमी, जरीकाठाचा शालू, असे वेगवेगळे शालू इथं मिळतात परवडणाऱ्या दरात.
या दुकानात आपण खरेदी करू शकता दीडशे रुपयांपासून 15 हजार रुपयांपर्यंतच्या साड्या.