घराची बांधणी आणि त्यातल्या वस्तूंची मांडणी वास्तूशास्त्रानुसार असावी, तरच नांदते सुख, शांती समृद्धी, असं ज्योतिषशास्त्र सांगतं.
पाकीट किंवा तिजोरी कधीच ठेवू नये रिकामी. एक रुपया का होईना पण त्यात ठेवावा.
तिजोरीत लाल कापडात ठेवावं चक्र किंवा शंख. त्यामुळे देवी लक्ष्मी होते प्रसन्न.
देवघरातलं पाण्याचं भांडं कधीच ठेवू नये रिकामं.
देवघरात असतो देवांचा वास. त्यामुळे तिथल्या तांब्यात ठेवावं दोन थेंब गंगा जल आणि तुळशीचं पाणी.
बाथरूम आणि किचनमधली भांडी कधीच ठेवू नये रिकामी. त्यामुळे कामांमध्ये निर्माण होतात अडथळे.
अर्धी किंवा पूर्ण पण भांडी नेहमी भरलेली असावी.
स्वयंपाकघरात आणि अन्नधान्य साठवून ठेवण्याच्या जागेत असतो देवी अन्नपूर्णेचा वास.
इथं अन्नधान्य ठेवावं पुरेपूर. आज-उद्याच्या अंदाजानुसार सामान आणल्यास अन्नपूर्णा देवता होते नाराज.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)