या झाडाला इंग्रजीत 'कॅमेलिया ट्री' (Camellia tree) असं म्हणतात.
इतर फळझाडांप्रमाणेच या झाडालाही फळं येतात.
फळांमध्ये असलेल्या बियांची पावडर करून त्यापासून सुका आणि ओला लाल रंग तयार केला जातो.
या रंगाचा वापर कुंकू म्हणून आणि लिपस्टीक म्हणूनही होतो.
कुंकवाच्या रोपाची लागवड घरात करता येत नाही, कारण त्याला योग्य प्रमाणात पाणी देणं आवश्यक असतं.
जास्त पाणी दिल्यास हे रोप जगत नाही, तर कमी पाणी दिल्यास त्याला फळ येत नाही.
कुंकवाच्या एका झाडातून 1 ते दीड किलो फळं मिळू शकतात. या फळांची बाजारातील किंमत जवळपास 300 ते 400 रुपये किलो इतकी आहे.
त्यामुळे शेतकरी बांधवांना या झाडांच्या लागवडीतून चांगला नफा मिळवता येऊ शकतो.
कुंकवाच्या झाडाची उंची 20 ते 25 फूट इतकी असते. साधारण पेरूच्या झाडाइतकीच जागा हे झाड व्यापतं.