सिद्धिविनायक मंदिर, मुंबई : या गणपतीला नवसाला पावणारा गणपती म्हटलं जातं. 1801 साली बांधलेलं हे भव्य मंदिर सेलिब्रिटींचंही आवडतं आहे.
दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, पुणे : या मंदिरात आहे 7.5 फूट उंच आणि 4 फूट रुंद बाप्पाची मूर्ती.
विघ्नहर मंदिर, ओझर : पुण्यापासून 85 किलोमीटर अंतरावर कुकडी नदीकिनारी वसलंय हे गणपती मंदिर.
गणपतीपुळे मंदिर, रत्नागिरी : मुंबईपासून 350 किलोमीटर अंतरावर आहे कोकणातील हे 400 वर्ष जुनं लंबोदर मंदिर.
उची पिल्ल्यार मंदिर, तिरुचिरापल्ली : त्रिची येथील रॉकफोर्टच्या शिखरावर वसलेलं हे मंदिर विजयनगरच्या राजघराण्यातील लोकांनी बांधलं होतं.
कनिपकम विनायक मंदिर, चित्तूर : आंध्र प्रदेशातील हे मंदिर आहे 1000 वर्षांहून अधिक जुनं.
रणथंबोर गणेश मंदिर, चेन्नईचं वरसिद्धी विनयागर मंदिर, केरळचं कलामासेरी महागणपती मंदिर, गंगटोकचं गणेश टोक मंदिर, इत्यादींसह राजस्थान आणि जयपूरमध्येही भारतातील काही प्रसिद्ध गणपती मंदिरं आहेत.
येत्या मंगळवारी, 19 सप्टेंबर रोजी घरोघरी, विविध सार्वजनिक मंडळांमध्ये बाप्पा विराजमान होईल.
दरवर्षीप्रमाणे दहा दिवस भाविक मोठ्या उत्साहात बाप्पाचा पाहुणचार करतील.