2024च्या सुरुवातीलाच पालटणार 'या' राशींचं नशीब

सुमारे 300 वर्षांनी डिसेंबरमध्ये जुळून येणार 3 राजयोग.

शश, रुचक आणि मालव्य राजयोगाचा प्रभाव पडणार सर्व 12 राशींवर.

3 राशीच्या व्यक्तींना होणार विशेष लाभ, नवं वर्ष सरणार सुखात.

या राशी आहेत  धनू, मेष आणि मकर.

नवीन वर्षात आपल्याला होऊ शकतो आर्थिक नफा, त्यासाठी तयार राहा.

धनू : हवी तशी नोकरी मिळेल, परदेशात शिक्षणाची इच्छा पूर्ण होईल. संवाद कौशल्य सुधारेल, त्याचा व्यवसायात फायदा होईल. जोडीदारासोबतचं नातं अधिक घट्ट होईल.

मेष - अनपेक्षित आर्थिक लाभ होईल. नोकरी, व्यवसायात प्रगती होईल, वैवाहिक जीवनात सुख येईल, अविवाहितांचं लग्न जुळेल. महत्त्वाची सर्व कामं पूर्ण होतील. नवं कार्य सुरू करण्यासही नवं वर्ष अनुकूल असेल.

मकर - संपत्तीत वाढ होईल. मनोरंजन, संगीत, हॉटेल, पर्यटन क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना निश्चितच लाभ होईल. स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. सरकारी नोकरी मिळण्याची शक्यता. नोकरीत बढतीही मिळू शकते.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)