फळझाडं, फुलझाडं आणि भाजीपाला लागवडीतून शेतकरी आता मिळवू लागले आहेत चांगलं उत्पन्न.
ग्लॅडिओलस फुलांच्या लागवडीतून एक शेतकरी कमवतोय लाखोंचा नफा.
उत्तर प्रदेशच्या फर्रुखाबाद भागातील शेतकरी हरदेश कुमार मागील 8 वर्षांपासून घेतात फुलांचं उत्पादन.
त्यांचा आदर्श घेऊन आता इतर शेतकरीही करू लागले आहेत फुलांची शेती.
हरदेश कुमार हे पूर्वी करायचे परंपरागत शेती. ग्लॅडिओलसच्या लागवडीबाबत त्यांनी मिळवली इंटरनेटवरून माहिती.
पश्चिम बंगालच्या कोलकाताहून बीज आणून सुरू केलं उत्पादन, आज त्यांच्या बागेतल्या फुलांना मिळते विदेशातून मागणी.
हरदेश कुमार अतिशय आकर्षक पॅकिंग करून फुलं पाठवतात दिल्लीत. तिथून त्यांची होते परदेशात निर्यात. त्यातून त्यांना मिळतो अत्यंत चांगला नफा.
त्यांनी सुरुवातीला केली 3 बीघा जागेत फुलांची लागवड. 1 बीघा जागेवरील लागवडीसाठी येतो 30 ते 40 हजार रुपयांचा खर्च.
तर, जेव्हा फुलांना मिळते चांगली मागणी तेव्हा होतं 80 हजार रुपयांपासून 1 लाख रुपयांचं उत्पन्न.