होळीला जास्त भांग पिऊ नका, नाहीतर...
होळी आहे रंगांचा सण.
अनेकजण भांग पिऊन खेळतात रंग.
ही परंपरा वर्षानुवर्षे आहे सुरू.
परंतु प्रमाणापेक्षा जास्त भांग प्यायल्याने शरीराचं होतं नुकसान.
भांग पिण्याचे नुकसान पुढीलप्रमाणे...
जास्त भांग प्यायल्याने वाढू शकतो तणाव, येऊ शकते निराशा.
यामुळे उलटी, मळमळ, डोकेदुखी होऊ शकते. थकल्यासारखं वाटू शकतं.
जास्त भांग प्यायल्याने तुमचं भानही हरपू शकतं.
लक्षात घ्या, भांग पिऊन गाडी चालवणं आहे गुन्हा, ते बेतू शकतं जीवावर.