कोथिंबीर आणि पुदिना अनेक दिवस फ्रेश राहण्यासाठी खास टिप्स

प्रत्येक स्वयंपाकघरात कोथिंबीर आणि पुदिन्याचा वापर होतो.

मात्र ही पानं फार काळ टिकत नाहीत, लगेच सुकतात.

आज आपण कोथिंबीर आणि पुदिना फ्रेश ठेवण्यासाठी काही खास टिप्स जाणून घेणार आहोत.

कुकिंग एक्सपर्ट शालिनी यांनी याबाबत माहिती दिली आहे.

मूळं कापून ही पानं ग्लासभर पाण्यात भिजवत ठेवा.

मग ती स्वच्छ धुवून सुकवा.

आता ब्राऊन पेपरमध्ये गुंडाळा.

पेपरमध्येच आपण ही पानं फ्रिजमध्ये ठेवू शकता.

यामुळे कोथिंबीर आणि पुदिना अनेक दिवस खराब होणार नाहीत.