विदर्भाची खाद्यसंस्कृती अख्ख्या महाराष्ट्रात आहे फेमस.
विदर्भ कोष्टी डाळ-कांदा घालतो खवय्यांना भूरळ.
हाच पदार्थ घरी कसा बनवायचा हे वर्ध्यातील गृहिणी कीर्ती अलोणे सांगतात...
साहित्य : 1/3 वाटी भिजवलेली चणा डाळ, अर्धा किलो कांदे, आलं-लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ, हळद, तिखट, गरम मसाला, धणे पावडर, जीरे पावडर, तमालपत्र, 1 वाटी तेल, धणे, खोबरे पेस्ट, कोथिंबीर.
सर्वप्रथम 5-6 तास चणा डाळ भिजवून घ्यावी. कढईत तेल तापवून त्यात चिरलेला कांदा शिजवावा.
कांदा शिजल्यानंतर त्यात धणे-खोबऱ्याची पेस्ट आणि थोड्या वेळाने आलं-लसूण पेस्ट अॅड करावी.
दोन्ही पेस्ट शिजल्यानंतर त्यात धणे-जिरे पावडर आणि मसाले घालावे. आता हळद, तिखट घालून मिश्रण चांगलं शिजू द्यावं. अंदाजे 2 मिनिटांनी गरम पाणी अॅड करा.
आता भिजवलेली डाळ अॅड करून पंधरा मिनिटं शिजू द्यावं. त्यानंतर मीठ अॅड करा. पुन्हा थोडा वेळ शिजल्यानंतर भाजीवर कोथिंबीर पेरा. आता विदर्भ कोष्टी स्टाईल झणझणीत डाळ-कांदा खाण्यासाठी तयार आहे.
आता विदर्भ कोष्टी स्टाईल झणझणीत डाळ-कांदा खाण्यासाठी तयार आहे.