छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. प्रज्ञा तल्हार यांनी याची सोपी रेसिपी सांगितली आहे.
यासाठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घेऊ शकता. साधारणात: यामध्ये गाजर, शिमला मिरची, कांद्याची पात, कोबी, बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेलं आलं, लसूण, इत्यादी साहित्य लागेल.
नाचणीचं पीठ, सोया सॉस, काळीमिरी पावडर, टोमॅटो सॉस आणि तेल हे साहित्य असणं आवश्यक आहे.
सर्वप्रथम नाचणीचं पीठ छान भाजून घ्या. हलकं ब्राऊन होईपर्यंत भाजा.
नंतर कढईमध्ये तेल तापवा. तेलात लसूण, आलं, हिरवी मिरची घाला. मग बारीक चिरलेल्या सर्व भाज्या ऍड करा. परतवून त्यात एक वाटी पाणी घाला आणि एक उकळी येऊ द्या.
नाचणीच्या भाजलेल्या पिठात पाणी घालून पीठ मिक्स करून घ्या. एक चमचा पिठासाठी एक वाटी पाणी घ्या.
उकळी आलेल्या भाज्यांमध्ये नाचणीच्या पिठाचं पाणी घाला. त्यानंतर आवडीनुसार त्यात काळीमिरी पावडर, टोमॅटो सॉस आणि मीठ घाला.
मिश्रणाला एक उकळी येऊ द्या. त्यानंतर गार्निशिंगसाठी वर कांद्याची पात ठेवा.
तुमच्याकडे तळलेले नूडल्स असतील तर तेसुद्धा तुम्ही गार्निशिंगसाठी वापरू शकता.