पालकापासून बनवा कुरकुरीत चकली

दिवाळीच्या फराळात चकली असते अनेकांच्या आवडीची.

पालकाचे आरोग्यासाठी आहेत भरपूर फायदे.

पालकाची चकली कशी बनवावी याची रेसिपी सांगतात वर्धा येथील गृहिणी अनुजा देशपांडे

साहित्य : धुतलेला पालक, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, बेसन पीठ, तांदळाचं पीठ, उडीद डाळीचं पीठ एकत्र करून तयार झालेलं चकली पीठ, तिखट, मीठ, हळद, धणेपूड, तीळ, ओवा, एक ते दोन चमचे बटर, लोणी आणि तळण्यासाठी तेल.

सर्वप्रथम धुतलेला पालक, हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता मिक्सरमध्ये बारीक करून प्युरी बनवून घ्या.

त्यानंतर एका वाटीत चकलीचं पीठ घेऊन त्यात पालकाची प्युरी अ‍ॅड करा.

त्यात हळद, तिखट, मीठ, धणेपूड, ओवा, तीळ आणि गरज वाटल्यास पाणी अ‍ॅड करून घट्ट गोळा बनवून घ्या.

पाण्याने भिजवत असतानाच पिठात कडकडीत तेलाचं मोहन ॲड करा.

गोळा तयार झाल्यानंतर चकलीच्या साच्याने चकल्या पाडून घ्या आणि खमंग तळा.