उपाशीपोटी पाणी पिणं फायदेशीर, पण नेमकी वेळ काय?

अनेकजण सकाळी झोपेतून उठल्यानंतर उपाशीपोटी पाणी पितात. 

हे पाणी आरोग्यासाठी असतं फायदेशीर.

...मात्र, सकाळी पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती?

पुण्यातील आयुर्वेदिक डॉ. अक्षय जैन सांगतात...

पाणी हे पचायला जड असतं, त्यामुळे तहान लागेल तेव्हाच पाणी पिणं योग्य आहे.

आयुर्वेदानुसार, सकाळी उठल्यावर ब्रह्ममुहूर्तावर पाणी प्यावं.

त्यावेळी शरिराचं तापमान वाढलेलं असतं आणि बाहेरचं वातावरण थंड असतं. त्यामुळे पाण्याचं सहज पचन होतं.

सूर्योदय झाल्यानंतर बाहेरचं तापमान वाढतं, तर शरिराचं तापमान कमी होतं.

तेव्हा अति पाणी प्यायल्यास अपचनाच्या समस्या होऊ शकतात. 

बह्ममुहूर्त म्हणजे पहाटे 4 ते 5.30 पर्यंतचा काळ.