आपल्या घरात असे अनेक पदार्थ असतात, ज्यांचे औषधी गुणधर्म आपल्याला माहित नसतात. शेवग्याच्या शेंगाही त्यापैकी एक.
शेवग्याच्या शेंगा आपण अगदी आवडीने खातो. शिवाय त्या आयुर्वेदाच्या दृष्टीने विविध आजारांवर रामबाण असतात.
या शेंगांमध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्त्व असतात.
या भाजीची पानंही असतात पोषक तत्त्वांनी परिपूर्ण. त्यातून पोटॅशियम, कॅल्शियम, फॉस्फरस आणि जीवनसत्त्व चांगल्या प्रमाणात मिळतात.
शेवग्याच्या पानांचं सेवन केल्यास अशक्तपणा दूर होतो. यात कोलेस्ट्रॉल कमी करण्याचेही गुण असतात.
यात अँटीबॅक्टेरियल गुणधर्मही आढळतात. ज्यामुळे त्वचेसंबंधित सर्व समस्या दूर होतात.
विविध औषधं बनवण्यासाठी केला जातो या पानांचा वापर.
लक्षात घ्या, शेवग्याची पानं विविध गुणांनी परिपूर्ण असली, तरी त्यांचं सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.