Summer Tips: टरबूज कलिंगडाइतकंच फायदेशीर!

टरबूज हे अत्यंत पौष्टिक असं हंगामी फळ आहे.

कलिंगडाएवढं भरपूर पाणी या फळात असतं. 

त्यामुळे उन्हाळ्यात शरिराची पाण्याची आवश्यकता भरून निघते. 

टरबुजात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी, ए आणि अँटीऑक्सिडंट असतं. 

ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. 

Chronic disease होण्याचा धोकाही टरबुजामुळे कमी होतो. 

यात व्हिटॅमिन ए असल्यामुळे डोळ्यांची दृष्टी तीक्ष्ण होते. 

विशेष म्हणजे टरबुजामुळे हृदयाचंही संरक्षण होतं. 

पचनसंस्था सुरळीत राहावी यासाठी आपण उन्हाळ्यात टरबूज खाऊ शकता.

टरबुजात कॅलरीजचं प्रमाण फार कमी असतं, परंतु पाणी आणि फायबर भरपूर प्रमाणात असल्यामुळे पोट बराच वेळ भरलेलं राहतं. 

परिणामी वजन कमी होण्यास मदत मिळते.