कितीही खरकटी असली भांडी, तरी चुटकीसरशी होतील स्वच्छ, वापरा ही ट्रिक!

कधीकधी भांडी कितीही घासली तरी त्यावरचे डाग जाता जात नाहीत.

मग भांडी तशीच अस्वच्छ राहतात.

...पण काही ट्रिक्स वापरून आपण भांडी करू शकता एकदम चकाचक.

गरम पाण्यानं भांडी धुवून त्यावर बेकिंग सोडा भुरभुरा.

आता स्पंजने भांडी घासा, मग बघा कशी आरश्यासारखी चकाकतील.

पितळेची भांडी व्हिनेगर आणि कांद्याच्या रसाने घासावी.

बेकिंग सोडा आणि व्हिनेगरमुळे खूप दिवसांचे डागही निघू शकतात सहज.

व्हिनेगरने तांब्याची भांडीही चकाकतात छान.

स्टीलची भांडी घासण्यासाठी व्हिनेगर आणि बेकिंग सोडा वापरावा.