खतरनाक! नागिणीमागून आले 18 कोब्रा साप

मध्यप्रदेशच्या सिवनीमधील अग्रोहा लॉन मॅरेज गार्डनमध्ये पार पडतात भव्य विवाहसोहळे. इथले देखावे, जेवण असतं लय भारी.

याच लय भारी गार्डनमध्ये कोब्रा सापाची पिल्लं आढळली आणि सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली.

कोब्राची पिल्लं दिसण्याआधी गार्डनमधून एक 4 फूट लांब नागीण निघाली होती. तिला सर्पमित्रांनी पकडून जंगलात सोडलं होतं.

त्याच्या दुसऱ्याच दिवशी तिची लहान पिल्लं तिला शोधत बिळाबाहेर पडली.

जिथून पिल्लं बाहेर आली, तिथे सर्पमित्रांनी जमीन खोदली.

जमिनीच्या आत पाहिल्यावर सर्पमित्रांनाही धक्का बसला.

तिथे एकूण 18 कोब्रा साप दडून बसले होते. या सर्व सापांना सर्पमित्रांनी पकडलं.

सर्पमित्रांनी सांगितलं, कोब्रा साप प्रचंड विषारी असतो. मग तो मोठा असला किंवा पिल्लू असला तरी त्याच्यापासून धोका असतो.

लहान कोब्रा हा मोठ्या कोब्राइतकाच खतरनाक असतो.