खिडकीत लावा खास रोप, मग बघा, एकही डास येणार नाही घरात!

पावसाळा सुरू होताच माजते डासांची दहशत.

घरात डास येण्यापासून रोखण्यासाठी आपण खिडकीत लावू शकता काही रोपं.

या रोपांच्या वासानंच डास पळतील दूर.

यासाठी सर्वात महत्त्वाचं ठरतं कडूलिंबाचं रोप.

कडूलिंबाच्या कडू वासानं जंतू, किडी पळतात दूर.

डासांना पळवण्यासाठी तुळसही ठरते रामबाण.

तुळशीचा तिखट वास डासांना रोखून ठेवतो खिडकीबाहेर.

पुदिन्याचा वासही डासांना सहन होत नाही.

खिडकीत ही झाडं असतील तर हवा शुद्ध मिळेल आणि घर राहिल डासमुक्त.