Poonam Pandeyचा जीव घेतला तो Cancer नेमका होतो कसा?

कॅन्सर हा असा आजार आहे, ज्याचं निदान आणि ज्यावर उपचार जवळपास अशक्य आहे.

बॉलिवूड अभिनेत्री पूनम पांडे हिचं वयाच्या 32व्या वर्षी कॅन्सरने निधन झालं आणि सर्वांना धक्काच बसला.

डॉक्टर जसवंत जैन यांनी सांगितलं की, सर्वायकल कॅन्सरविषयी अनेकजणांना माहितीच नसते. हेच या कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूचं मुख्य कारण आहे. 

या आजाराची लक्षणं पहिल्या स्टेजमध्ये दिसत नाहीत, मात्र योनीतून होणारा असामान्य रक्तस्त्राव हे याचं पहिलं लक्षण आहे.

हा रक्तस्त्राव साधारणत: शारीरिक संबंधांनंतर होतो. शिवाय मासिक पाळीनंतर होणारा किंवा मासिक पाळीदरम्यान होणारा प्रचंड रक्तस्रावसुद्धा या आजाराचं लक्षण आहे.

या रक्तातून दुर्गंध येतो आणि गर्भाशयात दुखतं. कॅन्सर मोठा असेल तर पाठीच्या खालच्या बाजूलाही दुखणं जाणवतं. तसंच पायाला सूज येते.

महिलांच्या गर्भाशयाचा जो सर्वात खालचा भाग असतो तो गर्भाशयाला योनीशी जोडतो. या भागाला म्हणतात Cervix. जेव्हा या Cervixमध्ये पेशींची असामान्यपणे, वेगाने वाढ होते तेव्हा सर्वायकल कॅन्सरची सुरूवात होऊ लागते.

ह्यूमन पैपिलोमा व्हायरस (HPV) हे या कॅन्सरमागचं मुख्य कारण आहे. एचपीवी हा ह्यूमन पैपिलोमा व्हायरसचा एक असा गट आहे ज्यातले 14हून अधिक व्हायरस वेगवेगळ्या कॅन्सरसाठी कारणीभूत ठरतात.

याव्यतिरिक्त एकापेक्षा अनेक व्यक्तींसोबत शारीरिक संबंध ठेवणं, शारीरिक संंबंधांतून इन्फेक्शन होणं (STDs), दीर्घकाळ गर्भनिरोधक गोळ्या घेणं, धुम्रपान करणं, HIV संसर्ग, इत्यादींमुळेसुद्धा हा आजार होऊ शकतो.