फळ लय भारी, पण Sea Buckthorn नाव ऐकलंय कधी?

नावात Sea असलं तरी याचा समुद्राशी दूर दूरचा नाही संबंध. 

अनेक पुस्तकांमध्ये आढळतो या रसाळ फळाचा उल्लेख.

उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशच्या अतिशय थंड, कोरड्या भागात पाहायला मिळतात ही फळं.

सी बकथॉर्न आहे एकमेव असं फळ ज्यात असतं ओमेगा 7 फॅटी ऍसिड, जे आहे अत्यंत दुर्मिळ. 

शिवाय यामध्ये असतात भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स.

हे आंबट फळ पिकल्यावर छान चविष्ट लागतं. जॅम आणि वाइन बनवण्यासाठी त्याचा वापर केला जातो.

सी बकथॉर्नच्या पानांचा चहा वजन कमी हाेण्यासाठी ठरू शकतो प्रभावी, असं सांगतात तज्ज्ञ.

शरिरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यापासून व्हिसरल फॅट जमा होण्यापासून रोखण्यापर्यंत सर्व गोष्टींसाठी केला जाऊ शकतो याचा वापर.

सी बकथॉर्न आहे एक औषधी वनस्पती. तिच्या पानं, फुलं आणि फळांपासून बनवली जातात विविध औषधं.